तुम्हालाही केक बनवण्याची आवड आहे का? पण ओव्हन किंवा मायक्रोव्हेव नसल्यामुळं केक मनासारखा होत नाहीये?
कुकरमध्ये केक बनवण्यासाठी फक्त तुम्हाला या पाच टिप्स लक्षात ठेवायच्या आहेत
केक बनवताना कुकर आधीच सात ते आठ मिनटं प्रीहीट करुन ठेवा. त्यामुळं तुमचा केक छान फुलेल
केक बेक करण्यासाठी ठेवायच्याआधी कुकिंग स्टँड ठेवा. त्यानंतरच बेकिंग टिन ठेवा
केक बेक करण्यासाठी ठेवायच्याआधी कुकिंग स्टँड ठेवा. त्यानंतरच बेकिंग टिन ठेवा
तुम्ही कुकिंग स्टँड न ठेवता बेकिंग टिन ठेवला तर केकच्या खालचा भाग लवकर शिजेल व वरचा भाग तसाच कच्चा राहिल.
जर तुमच्याकडे कुकिंग स्टँड नसेल तर कुकरमध्ये सुरुवातीला मीठ टाका. त्यानंतरच बेकिंग टिन ठेवा
बेकिंग टिनमध्ये केकचे बॅटर टाकायच्या आधी सगळीकडून छान बटर किंवा तूप लावून घ्या. बटर लावून झाल्यावर त्यावर थोडा मैदा भुरभुरवून घ्यावा. जेणेकरुन तुमचा केके खाली चिकटणार नाही
कुकरमध्ये केक बनवताना बॅटरमध्ये थोडेसे व्हिनेगर टाका. त्यामुळं केक फ्लफी आणि सॉफ्ट होईल
केक बेक करायला ठेवण्याआधी कुकरची शिट्टी काढून घ्या. कारण केक वाफेवर शिजतो.