आपल्या स्वयंपाकघरात हमखास वापरला जाणारा हा पदार्थ.
थंडीत ओव्याचं पाणी किंवा ओवा चावून खाल्ला जातो.
ओवा हा गरम पदार्थ आहे.
दररोज ओवा पाण्यासोबत खाल्ल्याने पोटदुखी, गॅस यासारख्या आजारांपासून आराम मिळतो.
ओव्यामध्ये गॅस्ट्रिक अॅसिड आणि पाचक अॅंजाइम असल्यामुळे ओव्याचे पाणी पचनसंस्थेशी निगडीत इतर त्रास रोखतो.
ओव्याचे पाणी शरीरातील खराब एलडीएल कोलेस्ट्रॉल बाहेर काढून टाकण्याचे काम करते.
ओव्याच्या पाण्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.
खोकला आणि कफ रोखण्यासाठी ओवा फायदेशीर आहे.
रिकाम्या पोटी ओव्याचं पाणी प्यायल्याने पोटाचा घेर कमी होतो.