सोनपापडीशिवाय दिवाळीचा सण अपूर्ण आहे. फराळ नसल्यास अनेकदा सोनपापडी दिली जाते.
कधी कधी सोनपापडी भरपूर शिल्लक राहते. मग अशावेळी या सोनपापडीचे करायचे काय असा प्रश्न पडतो.
घरात राहिलेल्या सोनपापडीपासून तुम्ही एक चविष्ट पदार्थ बनवू शकता. जाणून घेऊया सविस्तर
उरलेल्या सोनपापडीपासून तुम्ही खीर बनवू शकता. त्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात दूध उकळवून घ्या
त्यानंतर दुधात वेलची टाका व थोडं अजून उकळून घ्या. त्यानंतर सोनपापडीचा चुरा करुन त्या दुधात टाका.
मंद आचेवर 5 मिनिटांपर्यंत शिजवून घ्या. आता यात ड्रायफ्रूट्स टाका. आता खीर तयार आहे.
तुम्हाला थंड खीर आवडत असेल तर तुम्ही थोडावेळासाठी फ्रीजमध्ये ठेवून मग सर्व्ह करा.