स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी करा 'हे' 6 घरगुती उपाय

काहीवेळा शरीरावर गर्भधारणेमुळे तर कधी जास्त वजन वाढल्याने स्ट्रेच मार्क्स दिसतात.आजकाल लोक स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी विविध सौंदर्य साधनांचा वापर करतात. पण तुम्हाला हे भारतीय घरगुती उपाय माहित आहेत का?

मोहरीची पेस्ट

मोहरीमध्ये फॅटी अॅसिड आणि अँटीऑक्सीडंट गुणधर्म मुबलक प्रमाणात असतात. एक चमचा मोहरीची पेस्ट नारळाच्या तेलात मिसळून लावल्याने स्ट्रेच मार्क्स कमी होऊ शकतात.

एरंडेल तेल

एरंडेल तेलामध्ये प्रतिजैविक गुणधर्म असतात. गर्भधारणेनंतर त्वचेवर झालेल्या स्ट्रेच मार्क्सवर दररोज एरंडेल तेल लावल्याने स्ट्रेच मार्क्स कमी होऊ शकतात.

कोको बटर

कोको बटरमध्ये भरपूर प्रमाणात फॅट्स आणि व्हिटॅमिन ई असतात जे त्वचेला फायदेशीर ठरतात.त्वचेवर कोको बटर लावल्याने स्ट्रेच मार्क्स हलके होऊ शकतात.

कोरफड

कोरफडमध्ये असलेले प्रतिजैविक गुणधर्म शरीरावरील स्ट्रेच मार्क्स आणि काळे डाग कमी करतात.

खोबरेल तेल

खोबरेल तेलामध्ये फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतात. कोमट खोबरेल तेलाने त्वचेची मालिश केल्याने स्ट्रेच मार्क्स कमी होतात.

साखर स्क्रब

खोबरेल तेल आणि लिंबाच्या रसामध्ये साखर मिश्रण स्ट्रेच मार्क्स असलेल्या ठिकाणी लावा. यामुळे स्ट्रेच मार्क्स कमी होऊ शकतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story