बदाम की शेंगदाणे?

750 रुपयांचे बदाम की 185 रुपयांचे शेंगदाणे, तुमच्या शरीराला कोणाचा सर्वाधिक फायदा?

सर्वाधिक फायदा कोणाचा?

खाण्यामध्ये येणारे काजू, बदान, अक्रोड आणि अगदी शेंगदाणेही शरीरासाठी कमालीचा फायदा करणारे. असं असलं तरीही अनेकजण बदाम आणि शेंगदाणे यापैकी सर्वाधिक फायदा कोणाचा? याच प्रश्नाच्या उत्तरामागं लागलेले असतात.

कॅलरी

मुठभर बदामांमध्ये 170 कॅलरी असतात, तुलनेनं मुठभर शेंगदाण्यांमध्ये 166 कॅलरी असतात. या दोन्ही पदार्थांमध्ये विटामिन ई चं प्रमाण जास्त असतं.

विटामिन ई

तुमच्या शरीराला विटामिन ई ची जास्त गरज असल्यास बदाम खाण्याला प्राधान्य द्या. फोलेट नियासिन यांसारख्या विटामिनची गरज पूर्ण करायची झाल्यास तुम्ही शेंगदाणे खायला प्राधान्य द्या.

मॅग्नेशियमची घट

शरीरातील मॅग्नेशियमची घट शेंगदाण्याच्या तुलनेत बदाम चांगल्या पद्धतीनं भरून काढतो. त्यामुळं या परिस्थितीमध्ये तुम्ही बदाम खाण्यावर भर देऊ शकता.

कॅल्शियम आणि लोह

कॅल्शियम आणि लोहयुक्त घटकांचं प्रमाण बदामात सर्वाधिक असतं. कारण, शेंगदाण्याच्या तुलनेच बदामात या घटकांचं प्रमाण दुप्पट असतं.

झिंकचा पुरवठा

शरीरात झिंकचा पुरवठा करण्यासाठी तुम्ही शेंगदाणे किंवा बदाम यापैकी कोणताही पर्याय निवडू शकता.

Fats

राहता राहिला प्रश्न Fats चा तर, हृदयाच्या आरोग्यासाठी तुम्ही बदाम किंवा शेंगदाणे दोनपैकी कोणताही एक पदार्थ खाऊ शकता. त्यामुळं बदाम खायचेत की शेंगदाणे हे नक्की ठरवा आणि ते आवर्जून खा.

तज्ज्ञांचा सल्ला

(वरील माहिती सर्वसाधारण संदर्भांच्या आधारे घेण्यात आली असून, आहारात बदल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. )

VIEW ALL

Read Next Story