हिवाळ्यात थंडगार पाण्यानं अंघोळ करण्याचे फायदे पाहाच

Jan 06,2025

रक्ताभिसरण

थंड पाण्यामुळं शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत राहून पूर्ण दिवस शरीर उत्साहवर्धक राहतं.

रोगप्रतिकारक शक्ती

हिवाळ्यात थंड पाण्यानं अंघोळ केल्यास शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळं शरीरातील पांढऱ्या पेशी वाढतात.

मानसिक आरोग्य

थंड पाण्यानं अंघोळ केल्यामुळं मानसिक आरोग्य संतुलित राहतं. यामुळं तणाव आणि नैराश्य कमी होतं, झोप उत्तम लागते.

त्वचा आणि केस

थंड पाण्यानं अंघोळ केल्यास त्वचा आणि केसांमधील नैसर्गिक ओलावा कायम राहतो. याशिवाय शरीराती मेटाबॉलिझम उत्तम राहतं.

थंडीची भीती जाते

थंड पाण्यानं अंघोळ केल्यास शरीर थंड तापमानासाठी अनुकूल राहतं आणि किमान तापमान सहन करण्यासाठी तयार होतं.


(वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story