'या' चुकांमुळे वाढते पोटाची ढेरी, वजन कमी करायचं असेल तर आताच बदला सवयी

आपण फिट राहावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. पण बदलती जीवनशैली आणि वेळेची कमतरता यामुळे हे शक्य होत नाही.

वजन वाढण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात. अनेकदा छोट्या छोट्या चुका वजन वाढवतात.

अनेकदा आपल्या जीवनशैलीत सकाळी केलेल्या चुका वजन वाढण्यासाठी जबाबदार असतात.

सकाळी आपलं शरीर फार अॅक्टिव्ह असतं. त्यामुळे सकाळी तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतल्यास दिवसभर अॅक्टिव्ह राहू शकता आणि वजनावर नियंत्रण ठेवू शकता.

अनेकजण ऑफिसला लवकर जायचं असल्याने किंवा घाईत असल्याने नाश्ता करणं टाळतात, जे चुकीचं आहे. ब्रेकफास्ट न करण्याची सवय वजन वाढवू शकते.

सकाळी हेल्दी ब्रेकफास्ट शरीराला ताकद देतो आणि मेटाबॉलिजम वाढवतो. ज्यामुळे शरिरात अतिरिक्त चरबी जमा होत नाही.

अनेकजण सकाळी उठल्यावर लगेच चहा, कॉफीचं सेवन करतात. पण ही सवय पचनासाठी वाईट असून वजन वाढण्यास कारणीभूत ठरणारी आहे.

खासकरुन साखरेचा चहा आणि सोबत तळलेले पदार्थ खाणे शरीराचं नुकसान करतं आणि वजनही वाढवतं.

जास्त वेळ झोपणाऱ्यांनाही लठ्ठपणाचा त्रास होतो. फिट राहण्यासाठी फक्त 7 ते 8 तास झोप आवश्यक आहे.

यामध्ये देण्यात आलेले सल्ले सामान्य माहितीवर आधारित आहेत. त्यामुळे एखादं औषध, उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

VIEW ALL

Read Next Story