मुलांना शाळेत टाकण्याआधी त्याच्यासाठी नेमकं कोणतं बोर्ड निवडायचं हा पालकांसमोर मोठा प्रश्न असतो. समजून घ्या या बोर्डात नेमकं काय अंतर आहे.

CBSE हे केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड आहे, जे केंद्र सरकारच्या अधिकारात येतं. तर ICSE म्हणजे इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन आहे. याशिवाय काही राज्यात त्यांचं बोर्ड आहे.

CBSE मध्ये केंद्रीयकृत अभ्यासक्रम असतो. तर ICSE विषय सखोल पद्धतीने शिकवण्यासाठी ओळखलं जातं. तर स्टेट बोर्डात राज्यं अभ्यासक्रम तयार करतात.

CBSE मधील परीक्षेची पद्धत प्रमाणित असते. तर ICSE मधील परीक्षेची पद्धत अंतर्भूत मूल्यांकनाला महत्व देते. तर स्टेट बोर्डाचा पॅटर्न हा मूल्यमापनवर आधारित असतो.

ICSE इंग्रजीला महत्त्व देतं. तर CBSE सर्व भाषांचा समतोल साधतं. स्टेट बोर्ड संबंधित राज्याच्या मातृभाषेवर जोर देतं.

CBSE ग्रेडिंगसाठी CGPA सिस्टम फॉलो करतं. तर ICSE मध्ये टक्क्यांच्या आधारे ग्रेडिंग होते. स्टेट बोर्डात अनेक प्रकारचं ग्रेडिंग असतं.

CBSE मध्ये विषयांचे मर्यादित पर्याय असतात. तर ICSE मध्ये खूप पर्याय असतात. स्टेट बोर्डातही बरेच पर्याय असतात.

CBSE अॅप्लिकेशन आधारित शिकवण्यात लक्ष केंद्रीत करतं. तर ICSE मध्ये समजण्यावर जोर दिला जातो. स्टेट बोर्डात शिकवण्याचे अनेक प्रकार आहेत.

CBSE केंद्राकडून मान्यता मिळालेलं बोर्ड आहे. तर ICSE आंतरराष्ट्रीय आहे. स्टेट बोर्ड राज्यांकडून मान्यता मिळालेलं आहे.

CBSE राष्ट्रीय एकात्मकतेवर जोर देतं. ICSE आंतरराष्ट्रीय दर्जावर भर देतं. तर स्टेट बोर्ड हे राज्यातील गोष्टींवर जोर देतं.

VIEW ALL

Read Next Story