टक्कल कसं घालवायचं?

Published by: Zee Team | Jun 18, 2024

टक्कल पडणं ही एक सर्वसाधारण समस्या आहे. खराब लाईफस्टाईल आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे ही उद्भवते.

Published by: Zee Team | Jun 18, 2024

टक्कल घालवण्यासाठी त्या जागी मेथीच्या दाण्यांची पेस्ट लावू शकता. यातील प्रोटीन्समुळे केस गळती थांबते आणि केसांची वाढ चांगली होते.

Published by: Zee Team | Jun 18, 2024

शाम्पू लावून केस जोरात घासायची काहींना सवय असते. अशाने टाळू स्वच्छ होईल पण हेअरफॉलला सुरुवात होईल.

Published by: Zee Team | Jun 18, 2024

जास्वंदाच्या तेलात एमिनो अॅसिड आणि विटामिन्स असतात. यामुळे केसांना भरपूर पोषण मिळते.

Published by: Zee Team | Jun 18, 2024

लिंबाचा रस नारळाच्या तेलासोबत लावा. लिंबाच्या रसात आयर्न असते. यामुळे डॅंड्रफ दूर होतो.

Published by: Zee Team | Jun 18, 2024

टक्कल पडण्यापासून दूर राहण्यासाठी आठवड्यातून 2 वेळा तेलाने मालिश करा. केसांची वाढ चांगली होईल.

Published by: Zee Team | Jun 18, 2024

केसांना कोरफड लावा. यामुळे माथ्याची त्वचा मॉश्चराइज होते आणि तिला पोषण मिळते.

Published by: Zee Team | Jun 18, 2024

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Zee Team | Jun 18, 2024

VIEW ALL

Read Next Story