साठवलेला मांसाहार

साठवलेल्या मांसाहार हे बेली फॅट वाढवण्यास कारणीभूत असते. प्रोसेस्ड मांसाहार आणि ट्रान्स फॅटमध्ये अधिक असते. यामुळे पोटाची चरबी वाढते. याचे सर्वाधिक सेवन केल्याने हार्ट डिजिज आणि स्ट्रोकचा देखील धोका असतो.

​फास्ट फूड

फास्ट फूडमध्ये ट्रान्स फॅटचे प्रमाण जास्त असते, जे नियमितपणे खाल्ल्यास लठ्ठपणाचा धोका वाढतो. विशेषत: पोटाभोवती चरबी वाढते आणि हृदयरोग आणि मधुमेहाच्या धोक्याची टांगती तलवार राहते.

ब्रेकफास्ट सिरील

अतिरिक्त साखर पोटाच्या चरबीला कारणीभूत असते. अशावेळी रेडिमेड ब्रेकफास्ट सीरिल खाण्यापासून टाळले पाहिजे. कारण प्रत्येक सीरिलमध्ये अतिरिक्त साखर असते. त्यामुळे सीरिल निवडताना असा ब्रँड निवडा ज्यामध्ये कमी साखर आणि अधिक फायबर, प्रोटीन असेल.

सफेद ब्रेड

पांढर्‍या ब्रेड सारख्या रिफाइंड कार्ब्समधे जलद वजन वाढते. ही चरबी पोटाभोवती सर्वाधिक वाढते. मल्टी ग्रेन ब्रेडमुळे आहारात धान्य जाते. पण या पांढऱ्या ब्रेडचा थेट पोटाभोवती चरबी जमा होण्याशी संबंध असते.

कॉफी

ब्रेकफास्टमधून सर्वात आधी भरपूर साय आणि साखरेने बनवलेली कॉफी पिण्याची चूक करू नका. यामध्ये साखर असल्यामुळे ही कॉफी अनेक आजारांना आमंत्रण देते. ज्यामध्ये वजन वाढणे आणि पोटाचा घेर वाढणे यासारख्या समस्यांचा समावेश आहे.

VIEW ALL

Read Next Story