रोज 8 ग्लास गरम पाणी पिण्याचे फायदे

रोज सात ते आठ ग्लास पाणी पिणं आवश्यक आहे असा सल्ला डॉक्टर कायम देतात. शरीराला गरजेचं आहे तेवढं पाणी मिळाल्याने बरेचसे आजार कमी होतात.

रोज 8 ग्लास गरम पाणी प्यायल्याने शरीराला काय फायदे होतात ते जाणून घेऊयात.

पचनसंस्था सुधारते

सतत अपचनचा त्रास होत असल्यास गरम पाणी पिणं फायदेशीर ठरतं. गरम पाणी प्यायल्याने खाल्लेलं अन्न पचतं. त्यामुळे पचनसंस्था सुधारण्यास मदत होते.

पोट साफ होण्यास फायदेशीर

गरम पाणी पिण्यामुळे शरीरातील नको असलेले घटक बाहेर पडण्यास मदत होते. जर पोट साफ न होण्याची समस्या असल्यास गरम पाणी पिणं फायदेशीर ठरतं.

वजन कमी करणं

रोज गरम पाणी प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. गरम पाण्यामुळे कॅलरीज लवकर बर्न होतात. त्यामुळे फिटनेस एक्सपर्ट वजन कमी करण्यासाठी गरम पाणी पिण्याचा सल्ला देतात.

घसा खवखवणं

प्रदुषणामुळे घसा खवखवणं, लाल होणं किंवा घश्याच्या संबंधित आजार होतात. त्यामुळे जर सतत घश्याचा त्रास होत असल्यास गरमं पाणी पिणं फायदेशीर ठरतं.

कफाच्या त्रासावर गुणकारी

वारंवार सर्दी होण्याचा त्रास असल्यास रोज गरम पाणी प्यायल्याने फायदे होतात. गरम पाण्यामुळे कफ छातीत साठून राहत नाही, त्यामुळे निमोनियासारखे आजार दूर होतात.

त्वचेसाठी फायदेशीर

गरम पाणी पिण्यामुळे कोरड्या त्वचेची समस्या कमी होते. पुरेसं पाणी शरीराला मिळाल्याने त्वचा तजेलदार होते.

किडनीसंबंधित आजार

किडनीसंबंधित आजार असल्यास जास्तीत जास्त प्रमाणात पाणी प्यायल्याने किडनी स्वच्छ राहते. ( येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story