जास्त प्रमाणात बदाम खाल्ल्यास?

एका दिवसात 6 ते 8 बदामांपेक्षा जास्त बदाम सेवन करू नयेत. यामुळे वजन वाढू शकते आणि शरीराची उष्णता देखील वाढू शकते.(Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया या माहितीचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. Zee 24 Tass या माहितीची खातरजमा करत नाही.)

दिवसाला किती बदाम खावेत? (How many almonds to eat a day?)

रात्री 5 बदाम भिजवून (Soak almonds) ते सकाळी उठून साल काढून खावेत. नियमित प्रकारे असं केल्यास आपल्याला उर्जा मिळते.

खराब कोलेस्ट्रॉल बाहेर टाकण्यासाठी उपयुक्त

बदामचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी होते. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका देखील कमी होतो.

मधुमेहासाठी चांगल

भिजवलेल्या बदामांमध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम असते. जे टाईप 2 मधुमेह असलेल्या लोकांसाठी देखील खूप उपयुक्त आहे.

'या' गोष्टीचा त्रास होऊ शकतो

रात्री कोमट पाण्यात बदाम भिजवल्याने फायटिक आम्लाचे प्रमाण कमी होते. जर फायटिक आम्लाचे प्रमाण जास्त झाल्यास तुमच्या शरीरात कॅल्शियम,झिंक आणि मॅंगनीजची कमतरता भासू शकते.

बदाम खाण्याची योग्य पद्धत (right way to eat almonds)

बदाम कायम भिजवलेले खावे. बदाम भिजवून ठेवल्याने मऊ होतात आणि त्याची साल काढण्यास सोपं जातं.

म्हणून बदाम सालीसकट...

सालीसकट बदाम खाल्ल्यास शरीराला काही फायदा होत नाही. त्याशिवाय बदामाचे साल पचायला खूप जड असतं. त्यामुळे जर तुम्ही सालीसकट बदाम खात असाल तर असं करू नका. कारण बदामापासून होणारे फायदे तुमच्या शरीराला मिळणार नाही.

बदाम सालीसकट खायचा की नाही?

बदामाच्या सालीमध्ये टॅनीन (Tannin) नावाचा घटक असतो. टॅनीनमुळे बदामात असणारी उपयुक्त पोषकघटक शरीरात शोषण्यास अडथळा निर्माण होतो.

आरोग्यासाठी लाभदायक

बदाम हे फायबरचे समृद्ध स्रोत आहेत, जे शरीरातून अतिरिक्त कोलेस्टेरॉल बाहेर काढण्यासाठी उत्तम ठरतात. बदाम हे प्रथिने, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, अँटिऑक्सिडंट्स, फ्लेव्होनॉइड्स आणि व्हिटॅमिन ई समृद्ध आहेत.

Almond सालीसकटं खाणे योग्य की अयोग्य?

अनेक फळं (Fruits) हे सालीसकट खाल्ली जातात. सालीसकट फळं खाणं आरोग्यासाठी फायदेशीर (Beneficial for health) असतं. पण बदाम हे सालीसकट खावं की नाही याबद्दल अनेक जणांमध्ये संभ्रम आहे.

VIEW ALL

Read Next Story