कांदा आपल्या जेवणातील रोजचा भाग आहे. वेगवेगळ्या भाज्या, पदार्थांमधून आपण कांदा खात असतो.
कांदा खाण्याने शरिराला अनेक फायदे होतात. पण तुम्हाला माहिती आहे का, रात्री झोपवण्यापूर्वी एक कच्चा कांदा खाणंही फार उपयुक्त आहे.
कांदा शरिरातील रक्त शुद्ध करतो. तसंच रक्तातील विषारी घटक बाहेर काढण्यात मदत करतो.
कांदा फक्त रक्तच शुद्ध करत नाही, तर चेहऱ्यावर येणारे पिंपल्सही रोखतो.
कांदा खाल्ल्याने सर्दी, खोकल्याचा त्रास कमी होतो. त्यामुळेच खोकला झाला असल्यास कच्च्या कांद्याचा रस तयार करुन पाजला जातो.
कांद्यात व्हिटॅमिन सी आणि कॅल्शिअम असते. तोंडाच्या आरोग्यासाठी हे फार फायदेशीर ठरतात.
कच्च्या कांद्यात सल्फर असल्याने ते अनेक प्रकारच्या कॅन्सरपासून संरक्षण करतं. प्रोस्टेट कॅन्सरचा धोकाही कमी होतो.
कच्चा कांदा खाणं पोट फुगणं, फुफ्फुसासंबंधी समस्या सोडवतो. याशिवाय लघवीसंबंधी समस्येवर उपायकारक आहे.
उन्हाळ्यात कच्चा कांदा उष्मघातापासून संरक्षण करतो.
ही माहिती सामान्य माहितीवर देण्यात आली असून, तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तसंच वैद्यकीय बाब असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.