बदाम सालीसकट खाल्ल्याने होतो फायदा, सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट काय सांगतात?

Jul 05,2024


बदामामध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक असल्याचे सांगितले जाते. व्हिटॅमिन ए, के, ई, फायबर आणि हेल्दी फॅटसोबतच अँटीऑक्सीडंट गुणधर्म देखील यामध्ये आढळतात.


बदाम खाण्याचे फायदे आपल्याला सर्वांनाच माहित आहेत. आपण खूपवेळा बदामाची साल काढून त्याचे सेवन करतो. पण त्या सालीचे देखील शरीरासाठी भरपूर फायदे आहेत हे तुम्हाला माहित आहे का?


एनिमल स्टडी केल्यानंतर असे लक्षात आले की, बदाम सालीसह खाल्ल्याने पॉलिफेनॉल कोलेस्ट्रॉल ऑक्सिडेशन रोखतात. असं म्हटलं जात की रोज बदाम खाल्ल्याने ऑक्सिडाइज्ड एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते.


बदामाच्या सालीमध्ये पॉलिफेनॉल असल्याने फायबर भरपूर प्रमाणात असतात.यामुळे हृदयविकार आणि कर्करोगावर बदाम फायदेशीर ठरतात.


सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट एक्सपर्ट शीला कृष्णस्वामी यांच्या मते, बदाम सालीसोबत खाणे फायदेशीर आहे कारण त्याच फायबर असते जे पचनास मदत करते.


काही वयोवृद्ध लोकांना बदाम सालीसह खाल्ल्याने पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.


Naturevibe Botnicals चे संस्थापक ऋषभ चोखानी यांच्या मते, बदामामध्ये टॅनिन असते ज्यामुळे ते पचायला जड जाते. पचनासंबंधित समस्या असलेल्यांनी सोललेले बदाम खाणं टाळावं.


तज्ज्ञांच्या मते बदाम सालीसह खाणे फायदेशीर आहे. कारण सालीमध्ये फायबर असते.


बदाम मर्यादित खाणंदेखीस तेवढच गरजेचे आहे. तसेच जर सालीसोबत बदाम खाणार असाल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story