पूर्ण पिकलेली, कच्ची किंवा अर्धी कच्ची अशी कोणत्याही स्वरुपातील चिंच आरोग्यासाठी अतिशय फायद्याची.
चिंच खाल्याने साखरेची पातळी कमी करता येतं असे अनेक फायदे आहेत चला तर मगं जाणून घेऊयात
फायटोकेमिकल्स आणि अमीनो अॅसिड हे गुणधर्म असल्यामुळे चिंच आरोग्यासाठी चांगली असते.
चिंच जास्त प्रमाणात खाल्ल्याने रक्त पातळ होते आणि उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
अन्न पचनासाठी चिंच महत्त्वाची भूमिका बजावते. चिंचेच्या सेवनामुळं अन्नातील पोषक द्रव्ये शरीरात शोषून घेण्यास मदत होते.
अॅसिडिटी, कफ, अशक्तपणा येणं असा त्रास होत असेल तर चिंच खाणं फायदेशीर ठरतं.
चिंच आम्लयुक्त पदार्थ असल्यामुळं वारंवार तिच्या सेवनामुळं दात किडू शकतात. त्यामुळे चिंच खाल्ल्यानंतर तोंड स्वच्छ धुवावं. (वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही. कोणत्याही आहारविषयक बदलापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या)