वाढत्या वयानुसार शरीरात बदल होत जातात, तुमचं वाढलेलं वय हे तुमच्या त्वचेवर लगेचच दिसून येतं.
वयानुसार त्वचेवर सुरकुत्या येणं, कोरडी होणं या समस्या निर्माण होतात. त्यामुळे पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रिटमेंट करण्यापेक्षा व्हीटामीन सीयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा.
वयाच्या पस्तीसनंतर तुमची त्वचा रुक्ष आणि सुरकुत्या येत असतील तर तुमच्या डाएटमध्ये अॅव्होकॅडोचा समावेश नक्की करा.
अॅव्होकॅडोचं सेवन केल्याने त्वचेला पोषकतत्त्वं मिळतात. त्यामुळे त्यामुळे स्कीन तजेलदार राहण्यास मदत होते.
लिंबू हा नैसर्गिक क्लिंजर म्हणून ओळखला जातो.. तसंच अनेक शिट मास्क आणि फेसपॅकमध्ये लिंबाचा समावेश केला जातो.
लिंबाचं सेवन करणं देखील त्वचेसाठी आरोग्यवर्धक मानलं जातं. रोज सकाळी गरम पाण्यात लिंबाचा रस टाकून प्या. त्यामुळे स्कीनवरील पिंपल्स दूर होण्यास मदत होते.
मोसंबीमध्ये अँटिऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे मोसंबीच्या सेवनाने त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते.
कलिंगडमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. त्याशिवाय रक्तवाढीसाठी कलिंगड फायदेशीर ठरतं. कलिंगडच्या सेवनाने त्वचा हायड्रेटेट राहण्यास मदत होते.