बरेचजण वाढलेल्या वजनामुळे त्रस्त असतात. वाढलेले वजन कमी करण्यासाठी ते वेगवेगळे उपाय करत असतात. अशावेळी कोणत्या पदार्थांचे सेवन केल्याने आपल्या वजनावर परिणाम कारते हे समजून घेणं महत्वाचे ठरते.
अनेक जणांच्या रोजच्या आहारात पोळीचा सामावेश असतो. कोणत्या पदार्थाची पोळी खाल्ल्याने आपल्या वजनावर परिणाम कारते हे समजून घेऊन पोळी खाल्ली पाहिजे.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी गव्हाची पोळी खाणं टाळा. गव्हाच्या पोळी खाल्याने वजन वाढते. जास्त प्रमाणात त्याचे सेवन केल्यास काही लोकांना आरोग्याच्या समस्या उद्भऊ शकते.
बेसनाची पोळी खाल्याने तुमचं वजन कमी होण्यास मदत होते.
हिवाळ्याच्या थंडीत बाजरीची पोळी बरेच लोक खातात. बाजरीची पोळी खाल्याने वजन वाढतं. त्यामुळे ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांनी बाजरीच्या पोळीच सेवन करावे.
नाचणीची पोळी वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असते.
मिक्स भाज्यांची पोळी तुम्ही खाल्ली पाहिजे. निरोगी राहण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी ही पोळी फायदेशिर ठरते.
(दिलेली माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)