भारत जगातील सर्वाधिक बाईक विकत घेणाऱ्या देशांपैकी एक आहे. देशातील खूप मोठी लोकसंख्या बाईक चालवते.
दर महिन्याला लाखो बाईक्सची विक्री होते. दररोजच्या दगदगीपासून वाचण्यासाठी बाइक-स्कूटर फायदेशीर ठरते.
पण तुम्हाला माहिती आहे का, रोज बाईक चालविण्याचे नुकसान देखील आहे.
रोज बाईक चालवल्याने तुमचे गुडघे दुखू शकतात.
बाईक चालवल्याने पाठीवर ताण येतो. त्यामुळे पाठदुखीची समस्या ओढवते.
रोज बाईक चालवल्याने तुम्हाला मान दुखण्याच्या समस्येलाही सामोरे जावे लागू शकते.
खूप उन्हात बाईक चालवल्यास तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या उद्धवू शकते.
तसेच सनबर्नचा धोकादेखील असतो. कारण शरिराचा खूप मोठा भाग थेट उन्हात असतो.