बाप्पाचं विसर्जन करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा अन्यथा...
घरोघरी आणि सर्वाजनिक मंडळात बाप्पा विराजमान झाले आहे. अनंत चतुर्दशी 28 सप्टेंबरला बाप्पा परत आपल्या गावी जाणार आहे.
अनेकांकडे 10 दिवसांऐवजी दीड दिवस, 3 दिवस, 5 दिवस आणि 8 दिवसही गणेशाची स्थापना करण्यात आली आहे.
20 सप्टेंबर, बुधवारी घरगुती दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. त्यामुळे विसर्जन मुहूर्त जाणून घ्या.
दीड दिवसांच्या गणपती विसर्जनाचा शुभ मुहूर्त दुपारी 03:18 ते 06:21 पर्यंत असणार आहे.
हा मुहूर्त हुकल्यास रात्री 07.49 ते मध्यरात्री 12:15 पर्यंत तुम्ही बाप्पाला निरोप देऊ शकता.
लक्षात ठेवा की गणपती विसर्जनाच्या आधी विधीनुसार गणपतीची पूजा करावी. बाप्पाला मोदक आणि लाडू अर्पण करावेत. त्यासोबत दुर्वा अर्पण करा.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विसर्जन करण्यापूर्वी गणपतीची आरती नक्की करा. त्यानंतर भक्तीभावाने सन्मान आणि आदरपूर्वक विसर्जन करा. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)