मूड फ्रेश ठेवण्यासाठी आपण खूपदा कॅाफी किंवा चहा पितो, अनेकदा ही सवय आपल्या आरोग्यसाठी हानिकारक असते.
तर जाणून घेऊया जास्त कॅाफी प्यायल्याने तुमच्या शरीरावर काय परिणाम होतात...
कॅाफी प्यायल्यावर शरीरातील हालचाली वाढतात त्यामुळे ह्रदयाची ठोके नेहमीपेक्षा जास्त वाढतात.
कॅाफीचे सेवन करताना तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे कारण..
तज्ञांच्या मते जी लोकं दररोज जास्त कॉफी पितात त्यांच्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढते आणि हृदयविकाराचा धोका असतो.
जास्त कॅाफीचे सेवन केल्यावर झोपेचे वेळापत्रक बिघडते आणि तुम्हाला झोपेचा त्रास देखील होऊ शकतो.
कॅफिनमुळे शरीरात भूक कमी होते आणि त्याचा परिणाम तुमच्या आहारावर होतो.
जास्त ब्लॅक कॅाफी प्यायल्याने त्यातील कॅफिन आणि अॅसिडमुळे पोटात जळजळ आणि आम्लपित्त होतं.
जास्त कॉफीमुळे शरीराला उष्णता प्राप्त होते यामुळे उष्णतेचे विकार होऊ शकतात आणि हातापायांची, डोळ्यांची आग होणे, ज्ञानतंतू कमकुवत होणे, वंध्यत्व निर्माण होणे अशी लक्षणे दिसू लागतात.
कॉफी व साखरेच्या दुष्परिणामामुळे लठ्ठपणा, अति रक्तदाब, कॅल्शिअम कमतरता असे अनेक विकार होतात.