पावसाळ्यात आहारात समावेश करा काळी मिरी, मिळतील अगणित फायदे

पावसाळ्यात आजार पसरण्याची भीती असते. अशावेळी रोगप्रतिकारशक्ती मजबूत असावी लागते. त्यामुळं पावसाळ्यात तुम्ही एका मसाल्याचा वापर करुन आरोग्य जपू शकता.

पावसाळ्यात पाचनसंस्था मंदावते अशावेळी पोट बिघडणे, पोटात दुखणे, मळमळ अशा तक्रारी वाढीस लागतात. अशावेळी तुम्ही काळ्या मिरीचे सेवन करु शकता. काळी मिरीत अँटी ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळते.

पावसाळ्यात जेव्हा आजार वाढतात तेव्हा तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी काळी मिरी फायदेशीर ठरु शकते.

सर्दी-खोकला यासारख्या समस्यांवर काळीमिरी रामबाण उपाय आहे. नैसर्गिक कफनाशक म्हणूनही काम करते.

काळ्या मिरीत बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात. त्यामुळं जीवाणूंची वाढ रोखता येते व संसर्गाचा धोका कमी होतो.

काळी मिरीचे नियमित सेवन केल्यास आरोग्य चांगले राहते. हानिकारक जीवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करते.

पावसाळ्यात अपचन, पोटदुखी पचनाच्या समस्या उद्भवतात. काळी मिरी पोटात हायड्रोक्लोरिक अॅसिडचा स्त्राव वाढवून पचनास प्रोत्साहन देते.

VIEW ALL

Read Next Story