आईच्या गर्भातच अनेक गोष्टी होतात निश्चित

प्रत्येक व्यक्तीचं नशीब हे त्याच्या जन्मापासूनच ठरलेलं असतं. कोणत्याही व्यक्तीबद्दलच्या अनेक गोष्टी या आईच्या गर्भातच निश्चित होतात असं सांगितलं जातं.

नशीब बदलता येत नाही पण...

आपल्या मेहनतीच्या जोरावर नशीब बदलता येतं पण काही गोष्टी व्यक्तीला कधीच बदलता येत नाहीत. याबद्दल आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीति शास्त्रात सांगितलं आहे. या गोष्टी कोणत्या पाहूयात...

जन्मानंतर या गोष्टी बदलता येत नाहीत

चाणक्य नीति आजही अनेक गोष्टींसाठी लागू होते. चाणक्य नीतिमध्येच अशा गोष्टींबद्दल माहिती दिली आहे ज्या जन्मानंतर कोणीच बदलू शकत नाही.

1) गर्भातच निश्चित होतं वय

आचार्य चाणक्य यांच्या सांगण्यानुसार, आईच्या गर्भामध्येच व्यक्तीचं वय निश्चित होतं. वय निश्चित झाल्यानंतर व्यक्तीचं नशीब लिहिलं जातं असं चाणक्य नीति सांगते.

2) मृत्यूचा वेळही ठरलेला

मृत्यूचा वेळही व्यक्तीच्या वयाप्रमाणे आईच्या गर्भातच निश्चित होतो असं चाणक्य नीति सांगते.

3) मृत्यूची वेळ बदलता येत नाही

मृत्यूचा वेळही कोणला बदलता येत नाही. ज्या वेळी मृत्यू ठरलेला आहे तेव्हाच होतो, असं चाणक्य म्हणतात.

4) मृत्यू कसा होईल हे ही आधीच ठरलेलं

तसेच मृत्यू सहज होईल की यातना भोगाव्या लागतील हे व्यक्तीच्या कार्मावर निर्धारित असतं, असं चाणक्य नीति सांगते.

5) जीवन कसं असेल गर्भातच ठरतं

व्यक्तीचं जीवन कसं असेल हे सुद्धा आईच्या गर्भातच निश्चित होतं असं चाणक्य सांगतात.

6) किती कष्ट आणि सुख मिळणार हे ही आधीच ठरतं

आधीच्या जन्मात व्यक्तीने काय कर्म केलं आहे त्यावरुन त्या व्यक्तीला किती कष्ट आणि सुख मिळणार हे ठरतं, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

सामान्य संदर्भांवरून माहिती

वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.

VIEW ALL

Read Next Story