आकाशातून वीज पडण्यापूर्वी शरीर देते 'हे' संकेत

पावसाळ्यात बऱ्याचवेळा मुसळधार पावसासह वीज पडण्याचा धोका असतो. भारतात दरवर्षी हजारो लोक अंगावर वीड पडल्याने आपला जीव गमवतात.

पण तुम्हाला माहित आहे का? वीज पडण्यापूर्वी आपले शरीर आपल्याला संकेत देते.जर हे संकेत तुम्ही वेळीच ओळखलीत तर धोका टाळता येईल.

भारतीय हवामानशास्त्र नागपूर विभागाच्या वेबसाइटनुसार, आपलं शरीर वीज पडण्यापूर्वी आपल्यावा संकेत देते जे ओळखून आपण सुरक्षित राहू शकतो.

जर विजेचा आवाज येताच तुमचे केस वरच्या दिशेला उभे राहिले तर समजा तुमच्या अंगावर वीज पडू शकते.

तसेच नॅशनल जिओग्राफिकच्या वेबसाइटनुसार, ज्यावेळी ढगांमध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते त्यावेळी आपोआप आपले केस आकाशाचे दिशेने उभे राहतात.त्यावेळी तुम्ही सतर्क रहायला हवे. हा धोका वेळीच ओळखून घराचा किंवा छताचा आश्रय घ्यावा.

अशावेळी या चुका करणं टाळल्यास धोका कमी होऊ शकतो

टेलिफोनचे खांब किंवा तारांजवळ जाऊ नका.

तसेच मोबाईल फोन आणि इतर गॅझेट्यचा वापर टाळा.

मोठ्या संख्येने एकत्र उभं राहणं टाळा.

पाण्याच्या संपर्कात येऊ नका.

त्याचबरोबर झाडाचा आश्रय घेणे आणि धातूच्या वस्तूंचा संपर्क टाळा.

VIEW ALL

Read Next Story