शहरातील मुलांची रोगप्रतिकार शक्ती कमजोर होत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. ग्रामीण भागात राहणाऱ्या मुलांपेक्षा शहरातील मुलांमध्ये श्वसनाचे आजार वाढताहेत, असे दिसून आले आहे.
डे केअरमध्ये राहणे, दमट हवामान आणि शहरातील दाटीवाटी याचा मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. लहान मुलांच्या छातीत संसर्ग होण्याचा धोका वाढतो आहे, असे एका अभ्यासात दिसून आले आहे.
ग्रामीण भागात राहणाऱ्या मुलांच्या तुलनेत शहरी भागातील मुलांना सरासरी 17 संसर्ग दिसून आले आहेत. ज्यात सर्दी, खोकला, कफ यांचा समावेश आहे. तर, ग्रामीण भागातील मुलांमध्ये याचे प्रमाण कमी आहे.
शहरी भागातील मुलांची रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याने संसर्गाची तीव्रता वाढते. हवेतील प्रदूषणाचाही फटका बसतो, असं तज्ज्ञांचे मत आहे.
अभ्यासात असे आढळून आले की, सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ स्तनपान केल्याने नवजात बाळांचे आणि मुलांचे संक्रमणापासून संरक्षण होते.
दाट रहदारी असलेल्या भागात राहिल्याने छातीत संसर्ग होण्याचा धोका वाढतो आणि तंबाखूच्या किंवा सिगारेटच्या धुराच्या संपर्कात आल्याने खोकला आणि घरघर होण्याचा धोका वाढतो. हा धोका टाळण्यासाठी वायू प्रदूषण कमी करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत, असं डॉक्टरांचे मत आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)