भारतात मधुमेहींची मोठी संख्या आहे. चुकीच्या जीवनशैलीमुळे हल्लीच्या तरुणातही या शारीरिक व्याधीचं प्रमाणही वाढताना दिसत आहे.
मधुमेह पूर्णपणे बरा होण्यासाठी कैक औषधांचा आधार घ्यावा लागतो. सोबतच काही लहानमोठ्या सवयीतील बदलही इथं रुग्णांसाठी मदतीच्या ठरतात.
दैनंदिन आहारातील बदलही इथं महत्त्वाच्या भूमिकेत दिसतात. नारळाची एक सोपी चटणी, हा असाच एक घटक.
नारळाची ही चटणी बनवण्यासाठी ओल्या नारळाचं खोबरं, हिरवी मिरची, आलं आणि लसूण बारीक वाटून घ्या.
खोबऱ्याच्या वाटणामध्ये यानंतर लिंबू (चवीनुसार) आणि काळे तिळ, मीठ घाला आणि पुन्हा मिश्रण एकजीव करून घ्या.
तंतूमय घटकांसह मसालेदार अशी ही चटणी खायलाही चवदार आणि आरोग्यासही पूरक. या चटणीच्या सेवनानं रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित राहतं. (वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)