आपला मूड हा हार्मोन्सशी देखील संबंधित असतो.जेव्हा आपण दु:खी असतो तेव्हा आपल्या शरीरात हॅपी हार्मोन्स कमी होतात.
असे काही पदार्थ आहेत ज्यांचे सेवन केल्यामुळे मूड रिलॅक्स (relax mood).
स्ट्रेसमुळे चिडचिड होते. मूड खराब होतो. अशा वेळेस शरीरात हॅपी हार्मोन्स वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे.
डार्क चॉकलेटमध्ये असलेले अँटी-ऑक्सीडेंट्स आपला मूड सुधारण्यास मदत करतात.
बदाम, शेंगदाणे, अक्रोड, सूर्यफुलाच्या बिया, तीळ, भोपळ्याच्या बिया यासारखे ड्रायफ्रुट्स आणि बिया यांचे सेवन केल्याने मूड सुधारण्यास मदत होते.
मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी सफरचंद खावे. याने हॅपी हार्मोन्स वाढतात.
पालक खाल्ल्याने सेरोटोनिनची पातळी सुधारते, ज्यामुळे मूड सुधारतो.