शिळ्या भातापासून झटपट बनवा मऊ इडली, सोपी रेसिपी पाहा

बरेचदा रात्री उरलेला भात उरतो मग अशावेळी फोडणीचा भात किंवा दुपारच्या जेवणात तोच भात खाल्ला जातो. पण शिळ्या भाताची तुम्ही भन्नाट रेसिपीही बनवू शकता.

Mansi kshirsagar
Sep 10,2023


रात्रीचा भात उरल्यावर त्याच शिळ्या भाताची तुम्ही मउ इडली बनवू शकता. सकाळच्या नाश्त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. पाहूयात इडलीची रेसिपी

साहित्य

शिळा भात, १ कप रवा, १ कप दही, अर्धा चमचा बेकिंग सोडा, चवीनुसार मीठ, पाणी

कृती

इडलीचे पीठ बनवण्यासाठी सर्वप्रथम शिळ्या भातात थोडे पाणी घालून मिक्सरमधून काढून घ्या. नंतर हे बॅटर एका भांड्यात काढून घ्या.


नंतर एका कढईत रवा घ्या आणि तो मंद आचेवर गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्या. रवा थंड झाल्यावर त्यात दही आणि मीठ घाला व मिश्रण एकजीव करुन घ्या.


त्यानंतर भाताचे बॅटर आणि रव्याचे मिश्रण दोन्ही एकत्र करा व हलक्या हाताने 3-4 मिनिटांपर्यंत फेटून घ्या. त्यानंतर 20 मिनिटे हे मिश्रण असेच ठेवून द्या.


इडलीचे पीठ थोडे फुलल्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून पुन्हा फेटा आणि बेकिंग पावडर मिक्स करा.


इडलीचे भांडे घ्या व त्यावर थोडे तेल लावा व तयार बॅटर त्यात घालून 15 मिनिटे मध्य आचेवर वाफ घ्या


गरमा गरम इडली सांबार किंवा नारळाच्या चटणीसोबत खायला घ्या.

VIEW ALL

Read Next Story