तुम्हाला डायबिटिजचा त्रास असेल तर गरोदरपणात कफ सीरप घेणे टाळावे. यामध्ये अधिक प्रमाणात साखर असते जे शरीरातील साखरेची पातळी वाढवू शकते.
काही हर्बल प्रोडक्ट सुरक्षित नसतात त्यामुळे ते घेण्यापूर्वी लेबल तपासणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावेत.
काहींना घटकांची अॅलर्जी असते त्यामुळे कफ सीरप घेण्याआधी त्यामध्ये वापरलेली सामग्री तपासून घेणे.
एक्सपायरी डेट तपासूनच औषधं घ्यावीत. खोकला आणि घसा खवखवत असल्यास नैसर्गिक उपचार घ्यावेत.
मधासोबत कॅमोमिल चहा, आल्याच्या मूळापासून तयार केलेला चहा, लिंबू आणि मधाचा चहा किंवा मधासोबत लवंगचा चहा घेतल्यानेसुद्धा खोकल्यापासून आराम मिळतो.
जर कफ सीरप घेऊनही आठवडाभरात खोकला बरा होत नसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन वैद्यकीय उपचार घ्यावेत. (वरील माहिती सामान्य संदर्भावर आधारित असून, औषधांविषयीच्या मार्गदर्शनासाठी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. )