गायीचं की म्हशीचं दूध प्यायला हवं? हा प्रश्न तुम्हाला कधी ना कधी पडला असेल. याचे उत्तर जाणून घेऊया
दुधामध्ये कॅल्शियम जास्त प्रमाणात असते. यामुळे दात आणि हाडे मजबूत होतात.
दूध विटामिन आणि खनिजांचा उत्तम स्त्रोत आहे. यामध्ये विटामिन डी आणि विटामिन बी 12 आणि पोटॅशियम असते. जे आरोग्यासाठी लाभदायक ठरते.
उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि टाइप 2 मधुमेह सारख्या समस्या उद्भवण्याची शक्यता कमी होते.
गाय आणि दुधाचे वेगवेगळे फायदे आहेत. म्हशीच्या दुधाच्या तुलनेत गायीच्या दुधात कॅलरी कमी असते. यामुळे वजन नियंत्रणात राहते.
म्हशीच्या दुधात जास्त प्रमाणात कॅल्शियम आणि विटामिन डी आहे. यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात.
वजन वाढवणे किंवा मांसपेशी निर्माण करु इच्छिणाऱ्यांसाठी म्हशीचं दूध योग्य आहे.
म्हशीच्या दुधात प्रोटीन आणि आयर्नची मात्रा जास्त असते. पोषक तत्वांचे सेवन करु इच्छिणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरते.
गायीचे की म्हशीचे दूध प्याव हे व्यक्तीगत प्राथमिकता, उपलब्धता आणि पोषण संबंधी आवश्यकतेवर ठरवू शकता.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)