तुम्ही सुद्धा कमी पाणी पिताय? होऊ शकतात 'हे' ५ गंभीर नुकसान

Aug 16,2024


पाणी आपल्या शरीरासाठी अतिशय गरजेचे आहे. पाण्याशिवाय जीवन नाही.


तुम्हीही जर कमी पाणी पित असाल, तर त्यामुळे होणारे गंभीर नुकसान जाणून घ्या.


धकाधकीच्या कामामुळे अनेकजण कमी पाणी पितात, ज्यामुळे डिहाईड्रेशनची समस्या उद्भवते.


दिवसभर पुरेशा प्रमाणात पाणी पित राहणे गरजेचे आहे, ज्यामुळे तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता भासणार नाही.


कमी पाणी प्यायल्याने बध्दकोष्ठता आणि पचना संबंधीच्या समस्या होतात.


किडनीचे काम सुरळीत चालु असणे गरजेचे आहे. पाणी कमी प्यायल्याने किडनी संबंधीचे आजार होऊ शकतात.


पाण्याच्या कमतरतेमुळे स्किन कोरडी आणि निर्जीव होते. त्वचेला हाइड्रेट आणि चमकदार ठेवण्यासाठी पाणी पित रहाणे गरजेचे आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांच्या आधारे घेण्यात आली असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story