भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा याला 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकल्यावर भरपूर प्रसिद्धी मिळाली होती.
नीरज चोप्रा यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला रौप्य पदक जिंकवून देणारा एकमेव खेळाडू ठरला. नीरजला प्रसिद्धी मिळाल्यावर त्याच्या संपत्तीत सुद्धा मोठी वाढ झाली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार नीरज चोप्राची नेटवर्थ जुलै 2024 मध्ये एकूण 4.5 मिलियन डॉलर म्हणजेच 37.6 कोटी रुपये इतकी होती.
नीरज चोप्राची अधिकतर कमाई ही ब्रँड एंडोर्समेंटमधून येते. असं म्हंटलं जातं की, नीरज हा विराट कोहलीनंतर दुसरा खेळाडू आहे ज्याच्याकडे सर्वाधिक ब्रँड एंडोर्समेंट आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार नीरजची वर्षभराची सॅलरी ही 4 कोटी रुपये आहे. मात्र हा त्याच्या कमाईचा केवळ 10 टक्के हिस्सा असल्याचे बोलले जाते.
नीरजला इतर खेळाडूंप्रमाणे गाड्यांचा शौक आहे. त्याला महिंद्रा एंड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्राने Mahindra XUV 700 गिफ्ट केली होती. नीरजच्या कार कलेक्शनमध्ये Range Rover Sport, Ford Mustang GT, Mahindra Thar आणि Toyota Fortuner सारख्या आलिशान कार आहेत.
नीरज हा हरियाणा राज्यातील पानिपत येथे राहणारा असून येथे त्याचे तीन मजली आलिशान घर आहे.