अतिप्रमाणात पापड खाताय, सावधान!; या समस्यांना तोंड द्यावं लागेल

जेवणात पापड असला की ताट भरलेलं वाटतं.

पण तुम्हाला माहितीये का ? आपल्या सर्वांच्या आवडीचा पापड हा आरोग्यासाठी घातक आहे.

तळलेल्या पापडात तेल आणि फॅट जास्त असल्यानं आरोग्यासाठी हे हानिकारक आहे.

पापडासाठी वेगवेगळे खाद्यरंग वापरतात, अनेक मसाले वापरतात. यामुळे पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.

पापड उन्हात वाळवतो , यामुळे हवेतील धूळ-मातीतील जंतू काही प्रमाणात पापडावर असतात.

जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर पापड कमी प्रमाणात खा.

पापडात सोडियम सॉल्ट जास्त प्रमाणात असल्यानं त्यामुळे हार्ट अटॅक आणि किडणीची समस्या निर्माण होऊ शकते.

जर तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर पापड खाणं टाळावं.

पापडात फायबर कमी प्रमाणात असल्यानं पचायला जड असतात, यामुळे आतड्यांवर ताण येतो.

उडदाच्या पापडात सोडियम जास्त असल्यानं आरोग्याला हानिकारक आहे

अ‍ॅसिडिटीचा त्रास असल्यावर पापड कमी प्रमाणात खा.

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story