Health News

Health News : मासिक पाळीदरम्यान महिला करतात 'ही' चूक; आयुष्यभर फेडावी लागेल किंमत

Apr 10,2024

औषधं

अनेकदा पाळीदरम्यान वेदना असह्य झाल्या की महिला पेनकिलरची औषधं, गोळ्या घेतात. पण, त्याचा सकारात्मक परिणामच होतो असं नाही.

अपचन

पेनकिलरमुळं शरीरात गॅस तयार होऊन त्यामुळं अपचनाची समस्या वाढते. सततची मळमळ आणि ढेकर येऊ लागतात.

पेनकिलर

काही पेनकिलर औषधं हृदयाच्या समस्या वाढवतात. उच्च रक्तदाब आणि इतर व्याधी यामुळं आरोग्यावर परिणाम करू शकतात.

किडनीवर परिणाम

मासिक पाळीदरम्यान सतत पेनकिलर घेतल्यानं त्याचे परिणाम किडनीवर होतात.

मानसिक संतुलन

पेनकिलरच्या वापरानं शारीरिक आणि मानसिक संतुलनाला धोका पोहोचतो. चक्कर येणं, शांत राहणं, मळमळणं अशी लक्षणं यामध्ये दिसतात.

औषधांची सवय

सतत पेनकिलर घेण्यच्या सवयीमुळं औषधांवरील निर्भरता वाढते आणि शरीराला औषधांचीच सवय लागते. त्यामुळं मासिक पाळीदरम्यान शक्यतो पेनकिलर घेणं टाळावं. (वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांवर आधारित असून झी 24 तास याची खातरजमा करत नाही. )

VIEW ALL

Read Next Story