केळी खाताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजचे आहे.
आयुर्वेदात केळीसह काही पदार्थांचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे सांगितले आहे.
केळी पचनाला जड असतात. यामुळे केळी खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास अपचन, गॅस, पोट फुगणे, ऍसिडिटी आणि बद्धकोष्ठता अशा समस्या होऊ शकतात.
केळीसोबत कोणत्याही प्रकारचे दुग्धजन्य पदार्थ घेऊ नये. यामुळे तुमची पचनक्रिया बिघडू शकते.
कफ असेल तर केळीचा शेक पिऊ नये.
मांसाहारी पदार्थासह केळी खावू नये.
रात्री झोपताना केळी खाऊ नये.