जेवणानंतर तुम्हालाही अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो का?

अ‍ॅसिडिटीचा त्रास ही पचनसंस्थेशी संबंधित आहे. अ‍ॅसिडिटी झाल्यावर आंबट ढेकर येते आणि पोटात जळजळ होतं. काही लोकांना उलट्याही होतात.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जास्त तेलकट आणि मसालेदार अन्न खाल्ल्याने पोटातील पित्त वाढण्यास मदत मिळते.

अनेक वेळा अन्न मोठ्या तुकड्यांमध्ये खाल्ल्यामुळे अन्नाचे पचन होत नाही. त्यामुळे अ‍ॅसिडिटी होते.

दुपारच्या जेवणादरम्यान पाणी प्यायल्याने पोटातील पाचक एन्झाईम्सला हानी होते.

त्यामुळे अ‍ॅसिड रिफ्लक्सची समस्या निर्माण होते.

दुपारच्या जेवणानंतर लगेच झोपल्याने अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो.

दुपारच्या जेवणात जड पदार्थ, किंवा आंबट, अ‍ॅसिडिटी निर्माण करणारे पदार्थ एकत्र सेवन केल्यामुळे तिची समस्या वाढते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story