पावसाळी सहलीसाठी नाशिकला येणाऱ्या पर्यटकांविरोधात गुन्हा; हा काय प्रकार?

सावधान

पर्यटकांनो नाशिकमध्ये येणार असाल, तर सावधान; नाहीतर तुमच्याविरोधातही दाखल होऊ शकतो गुन्हा.

पावसाळी सहल

मजामस्तीसाठी आखलेली पावसाळी सहल कधी तुमच्यापुढं संकटं उभी करेल सांगता येणार नाही. कारण, इथं चक्क पर्यटकांविरोधातच दाखल होणार आहे गुन्हा.

आदेश

पावसाळी पर्यटनाच्या धर्तीवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी हा अजब आदेश जारी केला आहे.

पर्यटकांमध्ये भीती

वर्षाविहार आणि पर्यटनाबाबत प्रतिबंधित आदेशामुळं पर्यटकांमध्ये भीती आणि संभ्रमाचं वातावरण आहे.

जमावबंदी

पोलिसांच्या आदेशानुसार नाशिक जिल्ह्यातील 35 पर्यटन स्थळांवर जमावबंदी लागू असून, इथं थेट कलम 223 नुसार कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

नाशिक

नाशिकमधील पर्यटन स्थळ, किल्ले, धरण, धबधबे, दऱ्या इथं 5 पेक्षा अधिक पर्यटकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

वाहनांना पूर्णतः बंदी

धबधबे किंवा पर्यटन स्थळाच्या परिसरात एक किलोमीटर परिसरामध्ये दुचाकी ते सहा चाकी वाहनांना पूर्णतः बंदी असून, नाशिक ग्रामीण पोलिसांच्या आदेशाने नवा वाद उफळण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे.

VIEW ALL

Read Next Story