अंडी हे आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. यामध्ये अनेक प्रकारचे पोषक आणि जीवनसत्त्वे आढळतात.
अंड्यातील पिवळ बलकामध्ये कोलेस्ट्रॉल असतं. एका अंड्यातील पिवळ बलकमध्ये 185 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल असते.
मात्र अंडी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल आणि हृदयाचे आजार बळावत नाहीत.
व्हिटॅमिन ए, ई, ओमेगा-३ फॅटी ॲसिड, व्हिटॅमिन के आणि इतर अनेक जीवनसत्त्वे अंड्याच्या पिवळ्या भागात आढळतात.
हे आपली त्वचा, डोळे आणि केसांसाठी देखील फायदेशीर आहे.
अंड्याच्या पांढऱ्यामध्ये प्रोटीन आणि शून्य कोलेस्ट्रॉल असतं. एका अंड्यामध्ये सुमारे 6 ग्रॅम प्रोटीन असतं.