एसीमध्ये झोपल्याने शरीर आणि सांधे दुखतात का?

Jul 25,2023

सकाळी उठल्यावर सुरु होतात वेदना

सकाळी उठता तेव्हा तुमच्या शरीरात वेदना सुरू होतात. विशेषत: मान आणि पाठदुखी संपूर्ण शरीर ताठ होते. हात-पायांच्या सांधे आणि हाडांमध्ये वेदना होतात.

हा सामान्य प्रकार आहे

एसीमध्ये झोपल्यानंतर शरीर, सांधे, हाडे दुखणे ही एक सामान्य गोष्ट आहे. आणि ही समस्या टाळायची असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवा.

एसीमध्ये झोपल्याने शरीर का दुखते?

शरीरात वेदना होण्यामागे दोन कारणे आहेत. जेव्हा एसी चालू करतो तेव्हा दरवाजे आणि खिडक्या बंद करतो. यामुळे आतील तापमान थंड होते, पण शरीरातील आर्द्रता कमी होते. त्यामुळे त्वचा कोरडी पडू लागते. स्नायूंमध्ये कडकपणा येतो आणि अंग दुखते.

शरीराचं तापमान बदलतं

दुसरी कारण म्हणजे आपले शरीर नेहमी 37 अंश सेल्सिअसवर सेट असते. यापेक्षा जास्त गरम झाल्यावर घाम येणे सुरू होते. दुसरीकडे, जेव्हा आपण थंड तापमानात राहतो, तेव्हा हात-पायांचे सांधे, स्नायू अधिक थंड वाटतात. त्यांच्यावर अधिक परिणाम होतो

जास्त एसी वापरताय तर थांबा

जर तुम्ही जास्त वेळ एसी वापरत असाल तर त्यामुळे हाडेही कमकुवत होऊ शकतात.

शरीरातील वेदना टाळण्यासाठी ही काळजी घ्या.

कोणताही एक दरवाजा किंवा खिडकी उघडी ठेवा जेणेकरून ताजी हवा आत येऊ शकेल. तसेच खोलीतील आर्द्रता पूर्णपणे संपू नये.

एसीचे तापमान किती असायला हवं?

एसीची तापमान नेहमी 22 ते 26 डिग्री सेल्सिअस दरम्यान ठेवावे. एसीचे तापमान कधीही 16-17 डिग्रीवर ठेवू नका. (सर्व फोटो - freepik.com)

VIEW ALL

Read Next Story