डॉ.श्रीराम नेने अनेकदा त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नेहमीच आरोग्यासंबंधित टिप्स शेअर करत असतात. नुकताच त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सकाळी नाश्त्यामध्ये कोणत्या गोष्टी खाणं टाळाव्यात याबद्दल सांगितले आहे.
आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या गोष्टींचे सकाळी सेवन न केल्यास आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.खराब नाश्तादेखील लठ्ठपणा, पोट आणि हृदय या रोगांचे कारण बनतो.
माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेनेंनी नाश्त्यामध्ये या गोष्टींच सेवन टाळण्यास सांगितले आहे.
व्हाईट ब्रेडमधअये प्रक्रिया केलेले पांढरे पीठ असते ज्यामुळे ते नाश्त्यात खाणे अस्वस्थ करते.व्हाईट ब्रेड जास्त प्रमाणात खाल्ल्यास लठ्ठपणा, पोटाचा त्रास, हृदयविकार आणि मधुमेह यांसारख्या समस्या वाढू शकतात.त्याबरोबर ब्रेडमध्ये असलेली साखर हानिकारक ठरू शकते.
नाश्ता करताना रिकाम्या पोटी फळांचा रस प्यायल्यास शुगर स्पाइक, दातांच्या समस्या आणि पचनाच्या समस्या होऊ शकतात. त्याऐवजी ताजी फळं खाणं फायदेशीर ठरते.
सकाळी नाश्तामध्ये प्रक्रिया केलेले मांस खाणे आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते. यामुळे उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि पोटशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
सकाळी रिकाम्यापोटी गोड दही खाणे टाळावे.दह्यामध्ये प्रोबायोटिक्स आणि कॅल्शियम असतात परंतु ते रिकाम्यापोटी खाल्ल्याने पोटातील ऍसिडमुळे चांगले बॅक्टेरिया नष्ट होतात.
साखरेच्या तृणधान्यांमध्ये उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असतो,त्यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते आणि जर गोड तृणधान्य सकाळी खाल्ले तर रक्तातील लिपिडची पातळी आणि हृदयाच्या समस्या वाढण्याचा धाको अधिक असतो.