थंडीत अनेकदा आपण आजारी पडतो. आजरी पडू नये यासाठी रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणे गरजेची आहे.
यासाठी रात्री झोपण्यापूर्वी काही गोष्टी गरम दुधात मिसळून प्यायल्याने शरीराला थंडीशी लढण्याची ताकद मिळते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढेल.
दुधात हळद मिसळून प्यायल्याने घसादुखी, सर्दी आणि अंगदुखीपासून आराम मिळतो. याने आपली रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते.
मध आणि दुधाचे मिश्रण घसा शांत करते, खोकला कमी करते आणि चांगली झोप घेण्यास मदत करते.
आले पचन सुधारते आणि शरीराला उबदारपणा देते. आले मिसळून दूध प्यायल्याने सर्दी आणि सर्दीशी संबंधित इतर लक्षणांपासून आराम मिळतो.
बॅक्टेरिया आणि विषाणूंशी लढण्यासाठी दालचिनी खूप प्रभावी आहे. दुधात मिसळून खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते.
बदाम पावडर दुधात मिसळून प्यायल्याने हिवाळ्यात स्नायू मजबूत होतात आणि शरीराला ताकद मिळते.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)