उन्हाळ्यात एक स्वादिष्ट फळ म्हणून कलिंगड आवडीनं खाल्लं जातं.
कलिंगडमध्ये 92 टक्के पाणी असतं. यामुळे हायड्रेड राहण्यास मदत होते.
पण कलिंगड खाल्ल्यानंतर पाणी प्यायला हवं की नको? याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
आयुर्वेदानुसार कलिंगड खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. यामुळे शरीरातील पाण्याची पातळी वाढू शकते.
यामुळे पचन क्रिया कमजोर होऊ शकते. पोटदुखी, अपचन आणि गॅस सारख्या समस्या जाणवू शकतात.
कलिंगड खाल्ल्याच्या 30 मिनिटानंतर तुम्ही पाणी पिऊ शकता. या वेळात कलिंगडातून शरीरात गेलेले पाणी पचेल. आणि पचनक्रिया सामान्य होईल.
कलिंगड खाल्ल्यानंतर कोमट पाणी किंवा लिंबू पाणी पिणं चांगल ठरेल. लिंबू पाण्याचील विटामिन सी पचन क्रिया सुधारण्यास मदत होईल.
Disclaimer - येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याची पुष्टी करत नाही.