दुधात फक्त एक चमचा तूप मिसळा आणि पाहा कमाल
तूपामध्ये (Ghee) भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट आढळतात. दूध (Milk) आणि तुपाचे सेवन केल्याने शरीराला दुप्पट फायदा होतो.
दुधात एक चमचा तूप पिल्याने शरीरावर खूप सकारात्मक परिणाम दिसतात. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती (immune system) यामुळे मजबूत होते.
रात्री झोपण्यापूर्वी एक कप गरम दुधात तूप टाकून प्यायल्यास मेंदूच्या नसा शांत होतात आणि तुम्हाला शांत झोप लागते.
दुधात तूप मिसळून प्यायल्याने शरीरातील एंजाइम्स रिलीज होतात, ज्यामुळे पचनशक्ती मजबूत होते. पोटाच्या समस्या दूर होतात.
निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी तूप मिसळलेले दूध प्यायल्यामुळे फायदा होतो. तुमची त्वचा नैसर्गिक मॉइश्चरायझर्स होते.
एका ग्लास दुधात तूप मिसळून प्यायल्याने मेटाबॉलिज्म चांगल होतं. गॅस तयार होत नाही शिवाय तोंड येण्याची समस्या दूर होते.
सांधेदुखीचा त्रास होत असेल तर तूप आणि दुधाचे सेवन तुमच्यासाठी फायदेशीर आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)