उपाशी पोटी चहा पिणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.

Aug 22,2024


चहामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉल्स भरपूर प्रमाणात असतात. याच घटकांचे आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात.


चहामध्ये कॅफिनचं प्रमाणही अधिक असतं. त्यामुळे उपाशी पोटी चहा प्यायल्यानं ऍसिडिटी होऊन पोटात जळजळ होऊ शकते. पचनक्रियेवर याचा थेट परिणाम होतो.


उपाशी पोटी चहा प्यायल्याने भूक कमी लागू शकते. ज्यामुळे शरिराला आवश्यक ते पोषक तत्त्व मिळत नाहीत.


चहामुळे तहानही कमी लागते, परिणामी शरिराला आवश्यक प्रमाणात पाण्याचा पुरवठा न झाल्यास डिहायड्रेशन होतं.


उपाशी पोटी चहा प्यायल्यानं कॅन्सर होण्याचा धोका असतो, असे म्हटले जाते. पण यासाठी अजूनही वैद्यकीय पुरावा नाही.


अति चहा पिणं आरोग्यासाठी धोक्याचं आहे. पण प्यायचा असल्यास तुम्ही सकाळी नाश्त्यानंतर चहा पिऊ शकता. यामुळे ऍसिडिटी आणि पचनासंबंधिच्या समस्या कमी होतील.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story