दुपारच्या जेवणानंतरही हमखास आपल्याला संध्याकाळी 4 ते 6 दरम्यान भूक लागते. खरं तर ही वेळ म्हणजे भारतीयांची चहा नाश्ताची असते.
यावेळेत चहासोबत ती जे काही भूक लागलं म्हणून खाता ते तुमच्या शरीरासाठी हानीकारक ठरतं. मग अशावेळी या 4 ते 6 आपल्याला भूक लागली कर काय खावं?
दुपारी 4 ते 6 या भूक लागल्यावर आपण भरपेट खातो आणि मग रात्रीच जेवण टळतं. त्यानंतर रात्री उशिरा भूक लागल्यानंतर आपण परत स्न्रक खातो.
याचा परिणाम वजन वाढीसोबत अॅसिडीटीसह अनेक समस्यांचं कारण ठरतं. त्यामुळे आरोग्य तज्ज्ञनुसार या वेळेत खाणं टाळावे.
तुम्ही दुपारचं जेवण झाल्यानंतर 3.30 वाजता, एक ग्लास ताक, लिंबू पाणी किंवा प्रोटीन शेक घ्या. जर खूप भूक लागली असं वाटत असेल तर ब्लॅक कॉफी किंवा कोऱ्या चहा आणि सुका मेवा खा.
शिवाय 4 ते 6 या दरम्यान तुम्ही भाजलेले चणे, मखाना, ताजी फळे, सुका मेवा, संपूर्ण धान्यांपासून बनवलेली बिस्किटे खाऊ शकता. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)