केळी ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.
रोज सकाळी नाश्त्याला केळी खाल्ल्यानं अनेक आजारांपासून मुक्तता मिळते.
या मध्ये विटॅमिन ए, विटॅमिन बी 6, विटॅमिन सी,पोटॅशियम,मॅगनेशियमसारखे पोषकतत्वे असतात.
फळं खाणं हे आरोग्यासाठी ऊत्तम असलं तरी कोणती फळ कधी खावी हे माहीत असणं गरजेचं आहे.
तसचं उपाशी पोट असल्यावर केळ खाल्ल्याने या 4 समस्यांना तोंड लागेल.
उपाशी पोटी केळ खाल्ल्याने अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो.
केळामध्ये असलेल्या विटॅमिन्समुळे उपाशी पोटात असलेल्या अॅसिड सोबत रिअॅक्शन होऊ शकते.
सकाळी नाश्त्यामध्ये उपाशीपोटी केळ खाल्ल्यानं पचन संस्थेवर परिणाम होतो.
उपाशी पोटी केळी खाल्ल्याने डोकेदुखीचा त्रास होउ शकतो.
ज्यांना उपाशी पोटी केळी खाल्ल्याने अपचनाचा त्रास होतो त्यांना ह्रदयविकाराचाही त्रास होऊ शकतो.