वजन कमी करण्याचे सगळे फंडे फेल? मग मेथी दाण्याचे उपायाने होणार बारीक

Dec 05,2023


निरोगी आरोग्य आणि वजन घटवण्यासाठी आपण प्रत्येक जण आज लक्ष देतो. व्यायाम आणि डाएट करुनही तुमचं वजन कमी होत नसेल तर तुमच्या किचनमधील मेथी दाणे (Fenugreek Seeds) फायदेशीर ठरेल.


मेथी दाण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. मेथी दाणे डायबिटिजग्रस्त रुग्णांसाठी फायदेशीर आहे, असं तज्ज्ञ सांगतात.


मेथी दाण्याच्या सेवनामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. लोह, फायबर, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन डी सारखे पौष्टीक घटक मेथी दाण्यात असतात.


मेथीचा चहा करण्यासाठी एका पॅनमध्ये एक चमचा मेथीचे दाणे, दालचिनीचा तुकडा आणि एक ग्लास पाणी घ्या. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा आणि सकाळी रिकाम्या पोटी घ्या.


रात्रभर पाण्यात मेथी दाणे भिजवून सकाळी सॅलॅडमध्ये मेथी दाणे खाल्ल्यास तुम्हाला वजन कमी करण्यास फायदा मिळतो.


वजन कमी करण्यासाठी मध वापरल जाते. मध आणि मेथी या दोघांचा वजन कमी करण्यास फायदा होतो. त्यासाठी मेथी दाण्याचं पावडर आणि मध एकत्र करु दररोज खा. त्यानंतर कोमट पाणी प्या. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story