वजन कमी करण्यासाठी जवसाच्या बियांचं सेवन अतिशय उपयुक्त ठरतं. पोट आणि कंबरेची चरबी कमी करण्यासाठी अनेक जण जवसात्या बियांचं सेवन करतात.
प्रथिने आणि फायबर समृद्ध जवसाच्या बियांचं सेवन केल्यास लठ्ठपणापासून आरोग्यासाठी अनेक फायदे होतात.
पण 7 लोकांसाठी या आरोग्यदायी जवसाच्या बिया अतिशय धोकादायक ठरतात. बघा कोणासाठी जवसाच्या बिया धोकादायक आहे.
जर तुम्हाला लूज मोशनचा त्रास होत असेल तर या लोकांनी जवसाच्या बियांचं सेवन करु नये. कारण जवस खाल्ल्यास लजू मोशनची समस्या अधिक वाढते.
गर्भधारणेदरम्यान जवसाच्या बियांचं सेवन करु नये. जवसाच्या बिया या गरम असतात त्यामुळे रक्तस्त्राव किंवा गर्भपात होण्याची भीती असते.
जवसाच्या बियासोबत जास्त जास्त पाणी पिण्याची गरज असते. जर तुम्ही कमी पाणी प्यायला तर तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते.
जवसाच्या बियांचं सेवन केल्यास काही लोकांना एॅलर्जी होऊ शकते. त्यांना श्वास घेण्यास त्रास, रक्तदाब कमी होणे, मळमळ किंवा उलट्या होण्याची समस्या होऊ शकते.
मासिक पाळीत जवसाच्या बियांचं सेवन करु नये अन्यथा गरम जवसामुळे रक्तस्त्राव वाढण्याची भीती असते.
त्याशिवाय तुम्ही कुठले औषधं घेतल असाल तर जवसाचं सेवन करु नये. त्याशिवाय शूगर असलेल्या लोक गोळीचं सेवन करत असेल तर त्यांनी जवसाच्या बिया खाऊ नयेत. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)