डॉक्टरांनी सांगितलं शास्त्रीय कारण
दुधावरील सायपासून लोणी काढलं जातं. त्या लोण्यापासून तूप तयार केलं जातं. हे तूप आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतं.
तूप खाल्ल्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पचनक्रिया सुधारते, वाईट कोलेस्ट्ऱॉल कमी होतं. त्याशिवाय तुम्हाला व्हिटॅमिन केदेखील मिळतं.
पण तुम्हाला चपाती किंवा भाकरीला तूप लावून खाण्यामागील शास्त्रीय कारण माहिती आहे का?
चपाती ही गव्हापासून किंवा इतर धान्यांपासून बनवली जाते. त्यामुळे चपातीमध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात. प्रथिने आणि फायबरचं प्रमाणही असतं. या गोष्टी आपल्याला पचनास मदत करतात आणि आपलं पोट दीर्घकाळ भरल्यासारखं वाटतं.
चपाती किंवा भाकरीला तूप लावून खाल्ल्यास ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतं. याचा अर्थ तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतं ज्यामुळे साखरेची पातळी वाढत नाही.
त्यामुळे तूप लावून चपाती किंवा भाकरी खाल्ल्याने तुमची चयापचय क्रिया स्थिर राहण्यास मदत होते आणि तुमचं पोट दीर्घकाळ भरल्यासारखं वाटतं.
डॉक्टर म्हणतात की, मर्यादित प्रमाणात तूप खाल्ल्यास तुमची चरभी बर्न होण्यास मदत होते आणि तूप हे चयापचय वाढवतो.
तूपामुळे मेंदूचं कार्य सुधारतं, हाडे मजबूत होतात आणि मज्जासंस्था मजबूत होते, असं तज्ज्ञ सांगतात.