बदाम आपल्या शरिरासाठी प्रचंड फायद्याचं आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन, विटॅमिन्स, जिंक, ओमेगा एसिड 3, फायबर आणि भरपूर अँटीऑक्सिडेंट्स असतात.
रोज बदाम खाल्ल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यात मदत मिळते. याचं कारण त्यात विटॅमिन ई असतं.
याशिवाय यात फॅटी अॅसिड आणि पॉलीफेनॉल्स असतात. हे चेहऱ्यावर दिसणाऱ्या वयाच्या खुणा कमी करतात.
फायबर आणि प्रोटीन असणारे बदाम आपल्या बुद्धीमत्तेत सुधारणा करतात. यामधील विटॅमिन ई आणि बी-6 अल्जामयरचा धोका कमी करण्यात मदत करतात.
बदामाचे सर्वात जास्त फायदे मिळवण्यासाठी ते पाण्यात भिजवून ठेवा. यामुळे शरिराला बदामातील पोषणतत्वं चांगल्या पद्धतीने मिळवता येतात.
बदामातील ओमेगा 3 फॅटी अॅसिड आणि जिंक शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. ज्यामुळे अनेक आजारांपासून संरक्षण मिळतं.
अनेक रिसर्चमध्ये बदाम वजन कमी करण्यात मदत करतं असं स्पष्ट झालं आहे. यामधील पोषकतत्व तुमचं मेटाबॉलिजम वाढवतात, ज्यामुळे वजन कमी होण्यात मदत होते.
बदामात ओमेगा-3 आणि ओमेगा-6 सहित आवश्यक फॅट अॅसिड असतं, जे हार्मोनल संतुलित ठेवतं. बदाम हेल्दी फॅट हार्मोनच्या निर्मितीसाठी गरजेचं असतं आणि पीरियड्स रेग्युलर करण्यात महत्त्वाची भूमिका निभावतात.
बदामातील तेलात ओलिक अॅसिड आणि लिनोलिक अॅसिड असतं जे केसांचं आरोग्य सुधारतं.