चाळीशीत 20 वर्षाच्या तरुणाप्रमाणे दिसायचं असेल तर रोज खावा 'ही' एक गोष्ट

घरातील मोठे लोक नेहमीच बदाम खाण्याचा सल्ला देतात. याचं कारण बदाम खाण्याचे खूप फायदे आहेत.

बदाम शरिरासाठी फायद्याचं

बदाम आपल्या शरिरासाठी प्रचंड फायद्याचं आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन, विटॅमिन्स, जिंक, ओमेगा एसिड 3, फायबर आणि भरपूर अँटीऑक्सिडेंट्स असतात.

विटॅमिन ई

रोज बदाम खाल्ल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यात मदत मिळते. याचं कारण त्यात विटॅमिन ई असतं.

फॅटी अॅसिड आणि पॉलीफेनॉल्स

याशिवाय यात फॅटी अॅसिड आणि पॉलीफेनॉल्स असतात. हे चेहऱ्यावर दिसणाऱ्या वयाच्या खुणा कमी करतात.

बुद्धीमत्तेत सुधारणा

फायबर आणि प्रोटीन असणारे बदाम आपल्या बुद्धीमत्तेत सुधारणा करतात. यामधील विटॅमिन ई आणि बी-6 अल्जामयरचा धोका कमी करण्यात मदत करतात.

पाण्यात भिजवून खा बदाम

बदामाचे सर्वात जास्त फायदे मिळवण्यासाठी ते पाण्यात भिजवून ठेवा. यामुळे शरिराला बदामातील पोषणतत्वं चांगल्या पद्धतीने मिळवता येतात.

रोगप्रतिकारक शक्ती

बदामातील ओमेगा 3 फॅटी अॅसिड आणि जिंक शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. ज्यामुळे अनेक आजारांपासून संरक्षण मिळतं.

वजन कमी करण्यात मदत

अनेक रिसर्चमध्ये बदाम वजन कमी करण्यात मदत करतं असं स्पष्ट झालं आहे. यामधील पोषकतत्व तुमचं मेटाबॉलिजम वाढवतात, ज्यामुळे वजन कमी होण्यात मदत होते.

हार्मोनची निर्मिती

बदामात ओमेगा-3 आणि ओमेगा-6 सहित आवश्यक फॅट अॅसिड असतं, जे हार्मोनल संतुलित ठेवतं. बदाम हेल्दी फॅट हार्मोनच्या निर्मितीसाठी गरजेचं असतं आणि पीरियड्स रेग्युलर करण्यात महत्त्वाची भूमिका निभावतात.

केसांचं आरोग्य

बदामातील तेलात ओलिक अॅसिड आणि लिनोलिक अॅसिड असतं जे केसांचं आरोग्य सुधारतं.

VIEW ALL

Read Next Story